वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

सखीये अनुतापे वैराग्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086165 · अभंग क्र. २५०१

2501.
सखीये अनुतापे वैराग्यतापें अति संतप्त नयनी । अश्रु अंगी स्वेद रोमांच जीवी जीव मूर्च्छित वो ॥१॥
माझे मजलागी गुरुकृपा मन ते जाले उन्मन वो । देही देह कैसा विदेह जाले क्रिया चैतन्यघन वो ॥२॥
माझे मीपण पहाता चित्ती चित्त अचिंत वो । वृत्तिनिवृत्ति तेथे चिद्रुप जालो परमानंदे तृप्त वो ॥३॥
एका जनार्दनी एकत्वे जन वन समसमान एक । एकपणे परिपुर्ण जाला त्रैलोक्य आनंदघन वो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग