न करि त्याचे गांढेपण
2461.
न करि त्याचे गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥१॥
भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥धृपद॥
याचे सोई पाउल वेचे । मग कैचे अडथळे ॥२॥
तुका म्हणे खरे खोटे । न म्हणे मोटे लहान ॥३॥
अर्थ :
जो नारायणाची भक्ती करत नाही तो तर मूर्ख आहे परंतु असे असले तरी देखील नारायण सर्वांना तारण्याकरता नेहमी सज्य उभा आहे. हा भव सिंधू अफाट असा आहे परंतु नारायणाने भक्तांना तरुण जाण्याकरता भवसमुद्र केवळ छोटा केला आहे अगदी तळ्याप्रमाणे आता तो तरुन जाण्याकरता भक्ताने नारायणाला बोलविले पाहिजे. नारायणाच्या सोयीप्रमाणे जर पावले टाकले तर अडथळे तरी कसे येणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात नारायण शरण आलेल्या भक्तांना हा खरा आहे की खोटा लहान आहे की मोठा असे कधीही म्हणत नाही.
