उपाधीच्या नांवे घाति
2484.
उपाधीच्या नांवे घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणें काय बोलु ॥१॥
टाकूनिइया संग धरियेला देव । आता तो उपाय दुजा नाही ॥२॥
सर्व वैभव सत्ता जयाचे पदरी । जालो अधिकारी आम्ही बळे ॥३॥
एका जनादनीं तोडियेला संग । जालो आम्ही निःसंग हरिभजनीं ॥४॥
