सूर्य अंधारांतें नास
2461.
सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥
माझे जिणे देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥
देही देहअभिमान । जीवी मायेचें ते ध्यान ॥३॥
एका जनार्दनी माया । देहाधीन देवाराया ॥४॥