अवघा व्यापक दाविला ।
2500.
अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला ॥१॥
मन होते गुंडाळलें । आपुलें चरणी पै ठेविले ॥२॥
केले देहाचें सार्थक । तुटला जन्ममरण धाक ॥३॥
नाही पहावया दृष्टी । अवघा जनार्दनी सृष्टी ॥४॥
कार्यकरण हारपलें । द्वैत अवघे निरसले ॥५॥
उडालें वैरियाचें ठाणें । आता एकचि जहालें एकपणे ॥६॥
दुजा हेत हारपला । एका जनार्दनी एकला ॥७॥
