वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नका दंतकथा येथे सांग

🙏 3. संत तुकाराम · ABH-078274 · अभंग क्र. २४६०

2460.
नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथे पाहिजे साचार । न चलती चार आम्हापुढे ॥धृपद॥
वर कोणी मानी रसाळ बोलणे । नाही झाली मने ओळखितो ॥२॥
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली ॥३॥
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गाबाळाचे काय काम ॥४॥

अर्थ :
केवळ ब्रम्ह ज्ञानाच्या दंत कथा येथे कोणीही सांगू नाही तुमचे नुसतेच कोरडे बोल येथे कोण ऐकून घेणार आहे. येथ खरा अनुभव पाहिजे परमार्थ करत असताना आमच्या पुढे केवळ सोंग चालणार नाही. तुमचे वरवरचे रसाळ बोलणे हे कोण मानतो तुमचे मन अझुन परिपक्व झाले नाही शुद्ध झाले नाही हे आम्ही चांगलेच ओळखतो. राजहंस नावाचा पक्षी दुध आणि पाणी हे दोन्ही वेगवेगळे निवडतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जवळ शुद्ध अनुभव असणाऱ्या जातीचाच पाहिजे इतर सोंग घेणारा व इतर वरवर गप्पागोष्टी मारणाऱ्या गबाळ्याचे काय काम आहे?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग