वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

सेवके करावे सांगितले

🙏 3. संत तुकाराम · ABH-078213 · अभंग क्र. २४९२

2492.
सेवके करावे सांगितले काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥
काय देवा नेणो आले गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसा ॥धृपद॥
विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळे । ते दिसे या काळे अव्हेरिले ॥२॥
तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करू हरी काय सांगा ॥३॥

अर्थ :
सेवकाला सांगितलेले काम करणे हा सेवकाचा धर्म आहे आणि सांगितलेल्या कामाविषयी जबाबदारी बाळगणे हा स्वामी चा धर्म आहे. परंतु देवा तुमच्या अंगी एवढा भित्रेपणा कोठून आला आहे काही समजत नाही अलीकडे तुम्ही शक्तिहीन झाल्यासारखे दिसतात. आम्ही विष्णुदास ज्याच्या बळावर निर्भर (आनंदभरीत) राहतो तेच बळ या हरीने अव्हरले आहे असे दिसते. तुकाराम महाराज म्हणतात देवा त्यामुळे तुम्ही आता मला लवकरात लवकर वैकुंठाला नेण्याचे मूळ तरी पाठवा नाहीतर येथे राहून काय करू ते तरी सांगा?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग