वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

अखंड मुडतर । सासुरवा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077858 · अभंग क्र. २५००

2500.
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥
याची जाली बोळवण । आता न देखो तो शीण ॥धृपद॥
बहुतांची दासी । तये घरी सासुरवासी ॥२॥
तुका म्हणे मुळे । खंड झाला एका वेळे ॥३॥

अर्थ :
संसारा मध्ये अखंड मूर्खपणा आणि सासरवास असतो आणि अभिमानी व मूर्ख लोकांची करकर ही आपल्या पाठीशी असते. परंतु आता याची मला बोळवण म्हणजेच या दुःखाचे निवारण झाले आहे आता हा त्रास मला माझ्या डोळ्यांना दिसत देखील नाही. संसार रुपी घर होते त्यामध्ये मला सासुरवासणी प्रमाणे खूप जणांची दासी बनून राहावे लागत होते. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पांडुरंगा तुझ्यामुळेच आता या सर्व लोकांचा खंड एका क्षणात झाला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग