वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नाचावेंसे वाटे मना ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077860 · अभंग क्र. २४९८

2498.
नाचावेंसे वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥
चेष्टविली माझी गात्रे । सत्तासूत्रे हालती ॥धृपद॥
नामरूपे रंगा आली । ते चि चाली स्वभावे ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगे कवळिले ॥३॥

अर्थ :
माझ्या मनाला हरी नामाच्या छंदात नाचावेसे वाटते कारण छंद हा सत्व, रज, तम या तीन गुणा पैकी कोणत्याही एका गुणाच्या अधीन असतो. माझ्या शरीराच्या सर्व इंद्रियांचे सूत्र हरीच्या हातात आहेत आणि तोच त्यांच्या सत्तेने माझे शरीर इंद्रिय हलवित आहे. आहो माझे शरीर आणि इंद्रिय हे हरीच्या नाम रूपामुळेच रंगाला आली आहेत त्यामुळे ते हरी कडे चाल घेणे हे स्वाभाविकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगाने आमच्यातील द्वैत भावच नाहीसा केला आहे व त्याच्याशी माझा एक स्वरूप करून त्याने मला कवटाळले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग