शांतीचेनि मंत्रे मंत
2470.
शांतीचेनि मंत्रे मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥
तेणे तळमळ हारपले व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥
लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥
एका जनार्दनी शांत जाहला देव । कामनीक देव प्रगटला ॥४॥
