वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

बहुत प्रकार गव्हाचे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078159 · अभंग क्र. २४६५

2465.
बहुत प्रकार गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी ॥१॥
सरले परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥धृपद॥
घेतले घ्यावे वेळोवेळा । माय बाळा न विसंबे ॥२॥
तुका म्हणे रस राहिला वचनी । पडताळूनि तोचि सेवी ॥३॥

अर्थ :
गव्हाचा एकच प्रकार आहे परंतु त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार होतात आणि त्या पदार्थाच्या अवडीनेच आपला जीव हा नाचत असते. त्या पदार्थाची चव एकदा घेतली की पुन्हा ते पदार्थ खावेसे वाटतात जसे समुद्राची एक तरंग संपली की समुद्र पुन्हा आपले दुसरे तरंग दाखवतो त्याप्रमाणे. आईने आपल्या बाळाला एकदा घेतले की पुन्हा पुन्हा तिला त्याला घ्यावेसे वाटते ती कधीही आपल्या मुलाला विसरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुल बोबडे बोलते आणि त्याच बोबडे बोलण्याची आठवण काढून पुन्हा पुन्हा त्या मुलाचे बोलण्याचे रस सेवन करीत असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग