सर्व देवांचा हा देव
2507.
सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥
त्याचे ठायी भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥
वारंवार ठेवीन डोई । उगेच पायी सर्वदा ॥३॥
न मागे भुक्ति आणि मुक्ति । संतसंगति मज गोड ॥४॥
त्यांचे वेड माझे मनी । शरण एका जनार्दनी ॥५॥
