रतीच्या अंती जे होय
2385.
रतीच्या अंती जे होय सुख । सर्वांगी ते सर्वदा देख ॥१॥
इंद्रियाविण आहे गोडी । तेथींचा स्वादु कवण काढी ॥२॥
आधींच करणी कैसी यक्षिनी । गोडपणें कैसी देत आहे धणी ॥३॥
एका जनार्दनी लागला छंदु । एकपणेंविण घेतला स्वादु ॥४॥