मी मी म्हणता माझे मी
2397.
मी मी म्हणता माझे मीच मी नेणे । चुकली रविकिरणे सुर्या धुंडिती ॥१॥
मजलागी मी तो म्या भेटावे ते कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥
सबाह्म अभ्यंतरीं गगन सावकाश । तैसे घटावकाश महदाकाशी ॥३॥
एका जनार्दनी एकत्वे जन वन । जन आम्हा दिसे जनार्दन ॥४॥
