वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आमच्या कपाळे तुज ऐसी

🙏 3. संत तुकाराम · ABH-078248 · अभंग क्र. २३८५

2385.
आमच्या कपाळे तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥
काय या राहिले विनोदावाचून । आपुलिया भिन्न केले आम्हा ॥धृपद॥
कोठे मूर्त्तिमंत दावी पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥
तुका म्हणे आता आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥

अर्थ :
देवा आमच्या भाग्यानेच तुला अशी बुद्धी आली असावी म्हणजे आम्हाला भयातून आणि उपवत त्रासातून मुक्त न करण्याची बुद्धी आली असावी, असे म्हणजे आम्हाला भयातून व त्रासातून मुक्त करण्याचा योग पुन्हा येणार नाही, देवा तु आपल्यापासून आम्हाला भिन्न केलेस परंतु आमची अशी चेष्टा करण्यावाचून तुझे काही खोळबंले होते काय? देवा मूर्तिमंत पाप पुण्य कोठे आहे ते आम्हाला प्रत्यक्ष दाखव उगाच कशाचाही संकल्प आम्हाला का वाहायला लावतोस? तुकाराम महाराज म्हणतात देवा पांडुरंगा आता तुमची ही चेटूक गिरी तुम्ही आवरा आणि आमच्या पाठीमागे लावलेली कोटी पीडा ही नाहीशी करा.
5:40

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग