वाराणसी गया पाहिली द
2405.
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥
पंढरीसी नाही कोणा अभिमान । पाया पडे जन एकमेका ॥२॥
तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरी यम न ये ॥३॥
अर्थ :
मी वाराणसी गया द्वारका हे तीर्थक्षेत्र पाहिले परंतु पंढरीची सर कोणालाही येत नाही. पंढरी मध्ये कोणालाही अभिमान नाही तेथे सर्व लोक एकमेकांच्या पाया पडतात. तुकाराम महाराज म्हणतात जो एक वेळ पंढरीला जातो त्याच्या घरी यम येत नाहीत.
