वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आता हे उचित माझे जना

🙏 3. संत तुकाराम · ABH-077902 · अभंग क्र. २३८७

2387.
आता हे उचित माझे जना हाती । पाहिजे फजीती केली काही ॥१॥
मग हे तुमचे न सोडी चरण । त्रासोनिया मन येईल ठाया ॥धृपद॥
वाउगे वाणीचा न धरी कांटाळा । ऐसी का चांडाळा बुद्धी मज ॥२॥
तुका म्हणे जरि माथा बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढे ॥३॥

अर्थ :
देवा आता मला असे वाटते की लोकांच्या हातून माझी काहीतरी फजिती घडली पाहिजे. कारण माझी फजिती केली की मला त्रास होईल आणि त्रास झाला की माझे मन तुमच्याकडे ओढ घेईल मग त्या वेळेस मी तुमचे चरण सोडणारच नाही. व्यर्थ बोलण्यासाठी माझी वाणी कधीही कंटाळा धरत नाही अशी माझी चांडाळ बुद्धी का झाली आहे काय माहित? तुकाराम महाराज म्हणतात एकदा की माझ्या माथ्यावर फजितीचे घाव बसले की मग पुढे व्यर्थ लोकांशी बोलण्यासाठी जागाच राहणार नाही.
5:41

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग