कानावाटें मी नयनासी
2380.
कानावाटें मी नयनासी आलो । शेखी नयनाचा नयन मी जाहलों ॥१॥
दृष्टीद्वारां मी पाहे सृष्टी । सृष्टी हरपली माझे पोटी ॥२॥
ऐस जनार्दने मज केले । माझे चित्ताचें जीवपण नेलें ॥३॥
एका जनार्दनी जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥४॥
