वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

रसने रसभोग्य रसाचा भ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086402 · अभंग क्र. २४०७

2407.
रसने रसभोग्य रसाचा भोक्ता रस ग्रासी होय भेटी ।
रसस्वादाचा सौरसु तोची ब्रह्मारसो कृष्णीं पडतसे गांठी ॥१॥
आत्मा कान्हा भोग निधी । आम्ही सकळा भोग अवघी॥धृ०॥
श्राव्य श्रावक श्रवणा समाधान सहजी सिद्धचि पाहे ।
गगन गर्भे सरे गगना अलिप्त शब्दे कोंदाटले ठायी राहे ॥२॥
दृष्टी दृश्य नसे दृश्य सबाह्म दिसे दृष्टीविण डॊळा पाहे ।
अरुपाचे रुप अगुनी होउनी देख देखणे कवण आहे ॥३॥
घ्राणाचे जे घ्राण वासाचा अवकाशु ज्ञप्ती मात्र आहे शुद्ध ।
गंधाचा गंधु सुवास जीवन दृष्टी भोग सुगंध ॥४॥
देहाचे आंतील कठीण की कोंवळें न कळे तेथीचा भावो ।
आत्मारामीं वृत्ति जडोनी गेली मा सबाह्म रिता नुरेची ठावो ॥५॥
मनाचाही वेगु दिसताहे सवे नुप्तमाजीं उभा देवो ।
म्हणवोनी मन होते ते उन्मन जाले पडिला कृष्ण स्वभावो ॥६॥
काष्ठ भक्षितां दाहकु काष्ठामाजीं असे मथिलिया काष्ठाचि अग्नि ।
एका जनार्दनी कृपा देहींचाचि देही मी भोग भोगिता राहे कृष्ण होऊनि ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग