पाहता पाहता कैसे पाल
2386.
पाहता पाहता कैसे पालटले मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन ॥१॥
आनंदें जनार्दना लागलों मी पाया । गेली माझी माया नाहींपणे ॥२॥
देखणेंचि केवळ दिसताहे सकळक । सुखाचे निष्फळ वोतिलें जग ॥३॥
एक जनार्दनी निमाला एकपणे । मोहाचे सांडणे माया घेऊनी ॥४॥
