वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

सुखरूप ऐसे कोण दुजे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078165 · अभंग क्र. २३६९

2369.
सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा । माझ्या पांडुरंगा सारिखेंते ॥१॥
न लगे हिंडणे मुंडणे ते काही । साधनाची नाही आटाआटी ॥धृपद॥
चंद्रभागे स्नान विध तो हरीकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥

अर्थ :
माझ्या पांडुरंगा सारखे सुखरूप या जगामध्ये दुसरे कोण आहे ते सांगा? पंढरीला सोडून इतर कोठेही जाण्याची गरज नाही हिंडण्याची गरज नाही आणि पंढरीत गेल्यावर मुंडण करण्याची गरज नाही व इतर साधना करण्याची आवश्यकता नाही. पंढरीत गेल्यानंतर चंद्रभागेचे स्नान करावे व हरिकथा ऐकावी हाच विधी आहे व त्याने सदासर्वकाळ चित्ताला समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीमध्ये हरिनामाचा व जीव ब्रम्‍ह ऐक्याचा अवैध रुप काला आहे व हा लाभ वैकुंठाचे देखील दुर्लभ आसून हा विशेष लाभ संत संगतीने प्राप्त होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग