वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

रायाचे सेवक । सेवटीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-077921 · अभंग क्र. २३६८

2368.
रायाचे सेवक । सेवटीचे पीडी रंक ॥१॥
हा तो हिणाव कवणा । का हो नेणा नारायणा ॥धृपद॥
परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥
तुझे नाम कंठी । तुक्या काळासवे भेटी ॥३॥

अर्थ :
राजाच्या सेवकाला जर एखाद्या दरिद्री भिकाऱ्याने त्रास दिला तर, हे नारायणा मग यामध्ये कोणाचा हीन पणा झाला हे तुम्हाला कळत नाही काय? लोखंडाची परीसा बरोबर भेट होऊन देखील लोखंडाचे सोने झाले नाही तर. तुकाराम महाराज म्हणतात तुझे नांव माझ्या कंठात असून देखील माझी काळा बरोबर भेट झाली तर यात हिन पणा कोणाचा आहे हे नारायणा ते तुम्हीच समजून घ्यावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग