वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आवडीच्या ऐसे झाले ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078060 · अभंग क्र. २३८२

2382.
आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम ॥१॥
आता घेऊ धणीवरी । मागे उरी नुरे तो ॥धृ॥
साठवण मना ऐसी । पुढे रासी अमुप ॥२॥
तुका म्हणे कारण झाले । विठ्ठल या ती अक्षरी ॥३॥

अर्थ :
माझ्या मुखा मध्ये हरिनाम आले हे माझ्या आवडीनुसार झाले आहे. आता हे हरिनाम इतके सेवन करू की मागे परत बाकी शिल्लक राहिली नाही पहिजे. हरिनाम साठवण्यासाठी मना सारखी मोठी जागा आहे आणि पुढे हरिनामाची अमुप राशी देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल या तीन अक्षरांनेच माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे.
5:39

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग