लवण मेळविता जळे । का
2379.
लवण मेळविता जळे । काय उरले निराळे ॥१॥
तैसा समरस जालो । तुजमाजी हरपलो ॥धृपद॥
अग्नीकर्पुराच्या मेळी । काय उरली काजळी ॥२॥
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥
अर्थ :
मीठ जर पाण्यामध्ये मिसळले तर ते पाण्यापेक्षा वेगळे होऊन राहते काय? त्याप्रमाणे देवा मी तुझ्याशी समरस झालो असून तुझ्यातच मी हरवून गेलो आहे. अग्नी आणि कापूर यांचे मीलन झाले मग तेथे काजळी म्हणून काही शिल्लक राहते काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी एक ज्योत आणि तुझी एक ज्योत दोन्ही मिळवल्या तर अग्नी एकच उरतो त्याप्रमाणे आपल्या दोघाचेही आत्मज्योत एकच झाली आहे.
5:38
