वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

कैसा होतो कृपावंत ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078309 · अभंग क्र. २३८९

2389.
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणे नाही यातीकुळ । लागो वेळ नेदावा ॥१॥
ऐसी काय जाणो किती । उतरती उतरले ॥धृपद॥
दावी वैकुंठीच्या वाटा । पाहाता मोठा संपन्न । अभिमान तो नाही अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥
आले द्यावे भलत्या काळे । विठ्ठल बळे आगळा । तुका म्हणे आळस निद्रा । नाही थारा त्या अंगी । ॥३॥

अर्थ :
हरी भक्तांविषयी किती कृपावंत आहे याविषयी संत खूप वर्णन करुन सांगत असतात. त्याच्या भक्तांची जात कूळ तो तर विचारतच नाही परंतू त्यांचा उध्दार करण्यासाठी तो वेळ लावत नाही. असे कितीतरी भक्त आहेत की जे या भवसागराच्या पार उतरलेले आहेत व काही उतरतही आहेत ते किती आहेत हे देखील माहित नाही. हा हरी भक्तांना वैकुंठाच्या वाटा दाखवितो असा सर्वगुण संपन्न आहे. याच्या अंगी अभिमान तर नाहीच नाही परंतू भक्तांच्या भेटीकरता तो नेहमी वीटेवर उभा असून कधीही बसत नाही. त्याला शरण आलेला भक्त कोणत्याही भलत्या वेळेला येऊ दया त्यांचा तो अंगीकार करतोच असा हा विठ्ठल सर्वांपेक्षा वेगळा व बलवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाच्या अंगी आळस आणि निद्रेला अजिबात थारा नाही.
5:42

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग