वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

घर सोडोनि जावे परदेश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086242 · अभंग क्र. २४०१

2401.
घर सोडोनि जावे परदेशा । मजसवें देव सरिसा ॥१॥
कडे कपाटे सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥
आता कोणीकडे जावे । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥
एका बैसला निरंजनी । न जाइजे जनी वनी ॥४॥
२४०२ .
आता काय पुजु देवा ।
आता काय पुजुं देवा । माझी मज घडे सेवा ॥१॥
तोडुं गेलों तुळशीपान । तेथे पाहता मधुसूदन ॥२॥
अत्रगंध धूप दीप । तेंही माझेंचिक स्वरुप ॥३॥
एका जनार्दनी पूजा । पुज्य पूजक नाही दुजा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग