वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

मीच देवो मीच भक्त ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086220 · अभंग क्र. २३७४

2374.
मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥
हीच उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती ॥२॥
मीच गंध मीच अक्षता । मीच वाहें मीच पुर्ता ॥३॥
मीच धुप मीच दीप । मी माझे देख स्वरुप ॥४॥
मीच माझी करी पूजा । एका जनार्दनी नाही दुजा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग