वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आह्मी जाणावे ते काई

🙏 3. संत तुकाराम · ABH-078308 · अभंग क्र. २३७५

2375.
आह्मी जाणावे ते काई । तुझे वर्म कोणे ठायी । अंतपार नाही । ऐसे श्रुति बोलती ॥१॥
होई मज तैसा मज तैसा । साना सकुमार हृषीकेशा । पुरवी माझी आशा । भुजा चारी दाखवी ॥धृपद॥
खालता सप्तही पाताळा । वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळा । कैसा पाहो आपला ॥२॥
मज असे हा भरवसा । पढीये वोसी तया तैसा । पंढरीनिवासा तुका । म्हणे गा विठोबा ॥३॥

अर्थ :
देवा आम्ही अज्ञानी आहोत तुझ्या स्वरूपाचे मुख्य वर्म कोणते आहे हे आम्ही कसे जाणावे? कारण तुझ्या स्वरूपाचा अंत पार नाही असे श्रुती सांगत आहे. त्यामुळे हे ऋषिकेशा मला जसा तु हवा हवा वाटतो तसाच तु सुकुमार लहान व्हावे. आणि देवा तुझी चतुर्भुज रूप दाखवून माझी इच्छा तु पूर्ण कर. देवा तुझे स्वरूप म्हणजे सप्तपाताळा पेक्षा खाली सप्त स्वर्गाच्याही पलीकडचे आहे. असा मी लहान आहे आणि तुझे स्वरूप मी माझ्या डोळ्याने कसे पाहू शकेल? तुकाराम महाराज म्हणतात मला माहित आहे ज्या भक्ताला जसे तुझे रूप आवडेल तसा तु होतोस. हे पंढरीनाथा विठोबा असा तु आहेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग