वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

मज नष्टा माया मोह ना

🙏 3. संत तुकाराम · ABH-078022 · अभंग क्र. २४०२

2402.
मज नष्टा माया मोह नाही लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥
धिग हे शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥धृपद॥
मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥
न दिसती मज आपलेसे गुण । संचित ते कोण जाणे मागे ॥३॥
तुका म्हणे देखोनिया काई । पांडुरंगा पायी राखियेले ॥४॥

अर्थ :
अहो मी नष्ट आहे दुष्ट आहे माझ्या ठिकाणी मायामोह लोभ नाही कोणी माझा आदर केला तर मला त्याचा क्षोभ म्हणजे रागच येतो. माझ्या शरीराचा धिक्कार असो कारण मी कधीही कोणावर परोपकार केले नाही आणि माझ्यावर जर कोणी उपकार केले तर मी त्याचे आभार मानत नाही असा मी कृतघ्न आहे. अहो मला जर कोणी मिष्टांन्न खावयास दिले कोणी माझ्याशी गोड बोलले तर ते देखील मला आवडत नाही मग मला एक सांगा माझ्यापेक्षा नष्ट दुष्ट दुसरा येथे कोण आहे? मला कोणीही आपलेसे वाटत नाही कोणाचेही चांगले गुण मला दिसत नाही सर्वत्र मी दोष पाहतो काय माझे मागचे संचित आहे काय माहित? तुकाराम महाराज म्हणतात अहो या देवाने माझ्या मध्ये असे कोणता चांगलेपणा पाहिले ते मला काही कळत नाही आणि त्याने मला पायापाशी त्याच्या पायाजवळ ठेवले कसे हे देखील मला कळत नाही.
3:48

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग