उभ्या बाजारांत कथा ।
2403.
उभ्या बाजारांत कथा । हे तो नावडे पंढरिनाथा ॥१॥
अवघे पोटासाठी सोंग । तेथे कैचा पांडुरंग ॥धृपद॥
लावी अनुसंधान । काही देईल म्हणऊन ॥२॥
काय केले रांडलेंका । तुला राजी नाही तुका ॥३॥
अर्थ :
उभ्या बाजारांमध्ये हरिकथा करणे असा प्रकार पंढरीनाथाला आवडत नाही. अहो हे सर्व सोंग पोट भरण्यासाठी केले जातात मग तेथे पांडुरंग तरी कसा राहील? कथा करत असताना कोणीतरी आपल्याला श्रोतृवर्गा मधून काहीतरी अनुदान किंवा धन पैसे देईल यासाठी तो कथाकार लक्ष लावून बसलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात हे रांडलेका तू असे का केलेस तुझ्या अशा कर्माला मी तरी राजी नाही आणि तुला पांडुरंग ही मुळीच प्रसन्न होणार नाही.
