वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

वाट दावी त्याचे गेले

🙏 3. संत तुकाराम · ABH-078141 · अभंग क्र. २४००

2400.
वाट दावी त्याचे गेले काय । नागवला जो वारिता जाय ॥१॥
ऐसी मागे ठकली किती । सांगता खाती विषगोळा ॥धृपद॥
विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवा नव्हे नास ॥२॥
तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥

अर्थ :
ज्याला चांगले मार्ग दाखवण्याची सवय आहे त्याचे काहीही खर्च होत नाही परंतु ज्याला चांगला मार्ग दाखवूनही वाईट मार्गाने जातो तो मात्र नक्कीच नागवला जातो. असे मागे म्हणजे पूर्वी कितीतरी लोक फसले गेले आहेत त्यांना वाईट मार्गाने जाऊ नका असे सांगितले तरी वाईट मार्गाच्या विष गोळ्या हे लोक खातातच. तुला खोटे वाटत असेल तर जो मनुष्य पूर्णपणे विचार करून निर्णय घेतो त्या मनुष्याला विचारून पहा जो मनुष्य पूर्णपणे विचार करून कोणताही निर्णय घेतो त्या मनुष्याच्या कधीही जिवाचा नाश होत नाही त्याच्या परमार्थाचा देखील कधीही नाश होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जो आपल्या जीवावर रुसला असून जो आपल्या जीवनाचा नाश करून घेतो त्याच्यापुढे केशवाचे काय चालणार आहे?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग