लटिकेची साच दाविले अ
2384.
लटिकेची साच दाविले अचळ । पिडीतसे काळ किती म्हणू ॥१॥
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ॥धृपद॥
सांभाळी सांभाळी आपुली हे माया । आम्हासी का भयभीत केले ॥२॥
रूप नाही त्यासी ठेविले नाम । लटिकाची भ्रम वाढविला ॥३॥
तुका म्हणे का गा झालासी चतुर । होतासी निसूर निर्विकार ॥४॥
अर्थ :
हे विठ्ठला अरे तु हे खोटे जगत आम्हाला सत्य भासवले आहे व आम्ही ते खरे मानून विषयातच सुख मानीत बसलो आहोत त्यामुळे आम्हाला काळ किती त्रास देतो आहे तुच बघ. हे विठ्ठला अरे तुच एक सत्य आहेस सत्य आहेस सत्य आहेस मग आम्हाला हा जगताचा आकार का दाखविलास? देवा तुम्ही तुमची माया आता आवरा त्या मायेने आम्हाला भयभीत का केले आहे? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही इतके चतुर का झाला आहात अहो तुम्ही पूर्वी निर्विकार निर्गुण होते ना ते बरे होते.
5:40
