नव्हे परी म्हणवी दास
2393.
नव्हे परी म्हणवी दास । काही निमित्तास मूळ केले ॥१॥
तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचार ॥धृपद॥
नाही शुद्ध आचरण । परी चरण चिंतितो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । ऐसे का गा नेणा हे ॥३॥
अर्थ :
देवा मी तुमचा दास नाही परंतु स्वतःला तुमचा दास म्हणून घेतो कारण मी स्वतःला तुमचा दास म्हणून घेतले तर या निमित्त का होईना तुम्ही माझ्या कडे लक्ष द्याल मला तुमची प्राप्ती होईल. त्यामुळे हे देवा आता तुमचा धर्म काय आहे याविषयी तुम्ही स्वतःशीच विचार करा. देवा माझे आचरण शुद्ध नाही परंतु तुमच्या चरणाचे चिंतन मी करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा अहो तुम्ही हे सर्व जाणत नाही की काय?
5:43
