वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

घालुनिया मापी । देवभ

🙏 3. संत तुकाराम · ABH-078129 · अभंग क्र. २३७१

2371.
घालुनिया मापी । देवभक्त बैसले जपी ॥१॥
तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुर्कुंडी ॥धृपद॥
अमुपी उखते । आपण वोस आपण याते ॥२॥
देव आता जाला । उगवे संकोच वहिलाऊ ॥३॥
अखंड नेले वेठी । भार सत्याविण गाठी ॥४॥
आडकिला झोंपा । रिता कलेवरचा खोंपा ॥५॥
गोदातीरी आड । करिते करविते द्वाड ॥६॥
तुका म्हणे बळे । उपदेशाचे तोंड काळे ॥७॥

अर्थ :
काही मूर्ख देवभक्त देवाला विशिष्ट मापा मध्ये घालून जप करण्यास बसतात. देहाचे मुरकुंडी करून नित्य नीज देवाची पूजा करायची असते परंतु विशिष्ट मापात देवाला घालून पूजा केली तर देवाची सांडलवंड केल्यासारखे होते. अमर्‍यादित परमात्म्याला मर्‍यादित समजणे यामध्ये देवाचा कोणत्याही प्रकारचा लहानपणा येत नसून उलट आपणच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ओस असल्यासारखे म्हणजे आपल्याच स्वरूपाला नाहीसे केल्यासारखे होते. काही लोक आपल्या शिष्यांना सांगतात की देवाचा या या वेळी जन्म झाला या या वेळी त्याचा अवतार समाप्त झाला परंतु तसे काहीही नसून हा संकोच पहिला टाकून द्यावा. असे सांगणारे काही लोक आहेत व ऐकणारेही लोक आहेत परंतु हे दोघेही अखंड जन्ममरणाचे वेठबिगारी करतात व सत्य समजून न घेता इतर माईक पदार्थांचा भार आपल्या पदरात बांधुन घेतात. असे लोक आपल्या रिकाम्या देहरूपी झोपडीत भ्रमाचे झडप म्हणजे दार लावून आत्म्याला त्यामध्ये अडकवून ठेवतात. हा प्रकार म्हणजे कसा होतो तर एखाद्याने गोदावरीच्या तीरावरच स्नान करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी आड किंवा विहीर खाणावी असा मूर्खपणाचा हा प्रकार होतो. तुकाराम महाराज म्हणतात काही ठिकाणी नको ते उद्देश ब

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग