वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

माझे हाती आहे करावे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077929 · अभंग क्र. २३९९

2399.
माझे हाती आहे करावे चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावे ॥१॥
मागति या भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी ॥धृपद॥
बाळक धावोनि आड निघे स्तनी ॥घालावा जननी प्रेम पान्हा ॥२॥
तुका म्हणे करी कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हाती ॥३॥

अर्थ :
देवा मी तुमचे सतत चिंतन करत राहावे आणि त्या बदल्यात तुम्ही माझ्यावर कृपादान व तुमचे प्रेम मला देत राहावे एवढेच मला ठाऊक आहे. मागणाऱ्याचे भांडवल काय आहे तर देणाऱ्या दात्याची आठवण काढत रहावी व त्याच्याकडे जावे आणि देणाऱ्या दात्याचे त्याचे भांडवल काय आहे तर येणाऱ्या याचकाला दान देत राहावे व आपल्या नामाचे जतन करावे. बालकाचे काम काय आहे तर पळत जावे मातेच्या मांडीवर पडून अगदी निश्चिंत मनाने स्तनपान करावे आणि बालकाच्या स्तन मुखात घालून त्याला प्रेम पान्हा पाजावा हे आईने काम करावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा जसे कासवी आपल्या दृष्टीनेच तिच्या पिलांचे पोट भरत असते अगदी त्याप्रमाणे तू तुझ्या कृपादृष्टीने माझे रक्षण कर माझे पालन-पोषण कर सर्वांच्या रक्षणाची सुत्र दोरी तुझ्याच हाती आहे.
5:46

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग