वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

दहयाचिया अंगी निघे त

🙏 3. संत तुकाराम · ABH-078143 · अभंग क्र. २४०७

2407.
दहयाचिया अंगी निघे ताक लोणी । एका मोले दोन्ही मागो नये ॥१॥
आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे । दोहींशी समान पाहो नये ॥धृपद॥
पृथ्वीचा पोटी हिरा गारगोटी । दोहोसी समसाटी करू नये ॥२॥
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजू नये ॥३॥

अर्थ :
दह्याच्या अंगातून ताक आणि लोणी हे दोन्ही निघते परंतु दोघानाही एकाच मोलाने मागू नये. आकाशाच्या पोटामध्ये चंद्र आणि तारे आहेत परंतु दोघानाही एक सारखे पाहू नये. एकाच पृथ्वीच्या पोटात हिराही असतो आणि गारगोटी ही असतात परंतु दोघाचीही किंमत सारखी करून आदलाबदली कोणीही करू नये. तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणे संतांना जसे भजतो तसे सामान्य लोकांना भजू नये.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग