वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आपुलिया आंगे तोडी मा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077894 · अभंग क्र. २३५७

2357.
आपुलिया आंगे तोडी मायाजाळ । ऐसे नाही बळ कोणापाशी ॥१॥
रांडापोरे त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥धृपद॥
हर्षामर्ष जो हे नाही जो जिराले । तोवरी हे केले चार त्यांनी ॥२॥
मुक्त जालो ऐसे बोलो जाये मुखे । तुका म्हणे दुःखे बांधला तो ॥३॥

अर्थ :
आपल्या सामर्थ्याने आपल्या अंगातील मायाजाळ तोडू शकेल असे बळ कोणाजवळही नाही. नाही ते जमणारच नाही, ते कोणालाही शक्य नाही फार तर फार एकादा मनुष्य आपल्या पत्नीचा मुलांचा कुटुंबाचा त्याग करेल परंतु मन आणि वाचा यांना आवरणे अतिशय कठीण जाते. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या मुखाने बोलतो की मी मुक्त झालो आहे तोच तर खरा दुःखाने बांधलेला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग