कवण देव कवण भक्त । ए
2400.
कवण देव कवण भक्त । एक दिसे दोही आंत ॥१॥
भक्त ध्यानीं जंव बैसला । पूज्य पुजक स्वये जाहला ॥२॥
ध्यानीं हारपलें मन । सरले ध्याता ध्येय ध्यान ॥३॥
एका जनार्दनी भाव । देव म्हणण्या नुरे ठाव ॥४॥