पाहुं जाता नारायणा ।
2392.
पाहुं जाता नारायणा । पाहता मुकिजे आपणा ॥१॥
ऐसा भेटीचा नवलाव । पाहता नुरे भक्तदेव ॥२॥
पाहता नाठवेचि दुजे । तेंचि होइजे सहजें ॥३॥
एका जनार्दनी भेटी । जन्ममरण होय तुटी ॥४॥