ऐका ऐका भाविकजन । को
2356.
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥
तर्कीकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥धृपद॥
नका शोधू मतांतरे । नुमगे खरे बुडाल ॥२॥
कलिमध्ये दास तुका । जातो लोका सांगत ॥३॥
अर्थ :
जे कोणी खरे भाविक भक्त आहेत कृपा करून त्यांनी माझे बोलणे ऐका. तुम्ही तर्किकाचा संग टाकून द्या आणि पांडुरंगाचे स्मरण करत रहा. अहो तुम्ही अनेक मतमतांतरे पाहू नका तुम्हाला ते समजणार नाही पण त्या योगाने जर तुम्ही मत आणि मतांतरा च्या मागे जाल तर या भवनदीत मात्र बुडाल नक्कीच, खरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे भाविकजन हो या कलियुगामध्ये मी सर्व लोकांचा दास आहे त्यामुळे मी चांगलाच उपदेश सर्व लोकांना सांगत जात आहे.
