वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

उंबरांतील कीटका । हे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077935 · अभंग क्र. २३७२

2372.
उंबरांतील कीटका । हेचि ब्रम्हांड ऐसे लेखा ॥१॥
ऐसी उंबरे किती झाडी । ऐशी झाडे किती नवखडी ॥धृपद॥
हे चि ब्रम्हांड आम्हासी । ऐसी अगणित अंडे कैसी ॥२॥
विराटाचे अंगी तैसे । मोजू जाता अगणित केंश ॥३॥
ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटी ॥४॥
तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥५॥
ऐशी अगम्य ईश्वरी लीळा । ब्रह्मानंदी गम्य तुक्याला ॥६॥

अर्थ :
उंबरातील किडकाला हे उंबरच म्हणजे सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. अशी उंबरे त्या झाडाला किती असतात आणि असे उंबराची झाडे नवखंडा मध्ये किती असतात? आम्हाला जे दिसत तेच आमच्यासाठी ब्रह्मांड वाटते परंतु असे अगणित ब्रह्मांड आहेत जे विराटाच्या एका केसावर आहेत. असे विराटाच्या अंगावर अगणित केस आहेत ते मोजू गेले तर मोजताही येत नाहीत. असे कोट्यावधी विराट आहेत आणि हे सर्व ज्याच्या पोटात साठवले गेले आहेत. असा हा नंदाचा बाळ मुकुंद आहे एवढा व्यापक हा परमानंद असूनदेखील स्वतःला तान्हे लेकरू म्हणून घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशी ही ईश्वराची अगम्य लिला आहे परंतु केवळ ब्रम्‍हज्ञान झाल्यामुळे मला ही ईश्वराची लिला समजली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग