वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

एक आधार खोंचुनी स्वा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086269 · अभंग क्र. २३६२

2362.
एक आधार खोंचुनी स्वाधिष्ठाना येती मणिपुरी घेताती झटे ।
चंद्रसुर्य कला म्हणती बारा सोळा पवनासी करिती उफराटे ।
सतरावीचे क्षीर सेउनी शरीर कलीकाळवंचनीं ताठे ।
सबाह्म आत्माराम नेणुनी विश्राम व्यर्थचि करिती या चेष्टे ॥१॥
ते वर्मा चुकेलें रे ते वर्म चुकलें रे । जवळींच असता रे ते वर्म चुकलें रे ।
जवळींच असता अंतरी न पाहे । ब्रह्माप्राप्ती केवी होय ॥धृ.॥
मीमांसक मात्त कर्माचा आचार स्नानसंध्या यथायुक्ति ।
एक दोन तीन स्नानें झालीं तरी आगळी लाविती माती ।
द्वादश जपतां घरींची चिंता करिती नारायणस्मरण चिंत्तीं ।
स्वये नारायण की तेथे आपण नेणती स्वरुपस्थिती ॥२॥
चारी वेद पुर्ण आचार होम क्रिया नित्य नेम आचरती ।
शिखासुत्र मंत्र त्रिकाळ क्रिया संध्यादि यथापद्धति ।
पुजा ब्रह्मायज्ञ उपवास पारणे मध्यामातें नातळती ।
आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन कष्टचि पावत अंतीं ॥३॥
विष्णु उदरी त्रिभुवन अवघे म्हणउनि वैष्णव झाले ।
तुळशीवृंदावनें हरीचें पुजन विष्णुपदीं मिरविलें ।
हरिहर भेद करिताती वाद जाणविनें नागविले ।
आत्मज्ञानेविण न तुटे बंधन कणेविण उपणिलें ॥४॥
दैवत शिवापरतें नाही जंगम राहिले नेहटी ।
शैव पाशुपत रुद्राक्ष विभुति आचार लिंगे कंठी ।
पाषाण पुजुनी पवाडा करिती घालूनिया शस्त्रे पोटी ।
आत्मज्ञानेविण न तुटे बंधन मरण पावती हटीं ॥५॥
दरवेश काजी सैद मुलांना पडताती नित्य किताब ।
करिती पंच वक्त निमाज गळा घालुन पोकळ जुभा ।
परमात्मा देही न पडेचि ठायी पश्निमें मारिती बोंबा ।
आत्मज्ञानेंविन न तुटे बंधन अंतीं करिती तोबा तोबा ॥६॥
शक्तीचे उदरी त्रिभुवन अवघे आवडी पूजिती शक्ति ।
अर्चन हवन पूजन कामना वाढवुनी फळे घेती ।
जारण मारण स्तंभन मोहन अभक्त लाविले भक्ति ।
आत्मज्ञानेविण न तुटे बंधन चुकले ते निजमुक्तिः ॥७॥
बौध्यरुपालागीं क्षपाणिक जाहलें करिताती लुंचि कर्मे ।
वेद निरोधन मनी निरोधन आचरती जैंन कर्मे ।
वस्त्रे फेडण्या नग्न फिरताती न चुकती मरण जन्मे ।
आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन चुकली त्या गुरु वर्मे ॥८॥
भ्रष्टाचा आचार पालव माथा उफराटी काठी धरिती ।
पंचक्रोधी ध्यान पंथीचें स्मरण षटचक्रा उलटितीं ।
दर्शन खंडिती सज्जन निंदिती दृष्ट कर्मे आचरती ।
अत्माज्ञानेवीण न तुटे बंधन व्यर्थ तनु विटंबि ॥९॥
ऐसा एक एका संवाद करिता अहंता ममताची पाही ।
नेणतां निपुण बुडाले संसारडोही । स्वकर्माचरणमतांचें विवरण परमात्मा न पडेचि ठायी ।
एका जनार्दनी अनुभवी तो जाणे सर्वेश्वर याच देही ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग