वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

आम्हा येणे न जाणे जि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086239 · अभंग क्र. २३८१

2381.
आम्हा येणे न जाणे जिणें ना मरणें । करणे ना भोगणें पापपुण्य ॥१॥
जैसे असों तैसे आपोआप प्रकाशों । कवणा न दिसो ब्रह्मादिका ॥२॥
नवल नवल सांगती सखोल । अनुभवीं हे बोल जाणताती ॥३॥
आम्हा कवण पदा जाणे ना कवण देवा भेटणें । आप आपणांमाजी राहणें अखंडीत ॥४॥
सत्य कैलास वकुंठ हे आम्हा माजी होती जाती । या सकळा विश्रांती आमुच्या रुपीं ॥५॥
चंद्र सुर्य तारा हा पंचभौतिक पसारा । आम्हांमाजीं खरा होत जात ॥६॥
इतुके दिधले आम्हांक गुरुजनार्दनी । एक जनार्दनी । एका जनार्दनी व्यापियेला ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग