ऐसी ठावी वर्मे । तरी
2391.
ऐसी ठावी वर्मे । तरी सांडवलो भ्रमे ॥१॥
सुखे नाचतो कीर्तनी । नाही आशंकित मनी ॥धृपद॥
ऐसे आले हाता । बळ तरी गेली चिंता ॥२॥
सुखे येथे जाले तरी । नाही आणिकाची उरी ॥३॥
ऐसे केले देवे । पुढे काही चि न व्हावे ॥४॥
तुका म्हणे मन । आता जाले समाधान ॥५॥
अर्थ :
मला हरीचे असे वर्म समजले आहे की त्यामुळे माझा सर्व प्रपंचाचा भ्रम निघून गेला आहे. त्यामुळेच मी किर्तनामध्ये सुखाने नाचतो आणि नाचताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका येत नाही. अशा प्रकारचे फळ माझ्या हाती आले असून माझी सर्व चिंता दूर केली आहे. अशा प्रकारचे सुख मला प्राप्त झाले असून इतर काहीही माझ्या मनात उरलेले नाही. देवाने मला अशा पूर्णत्वास नेले आहे की पुढे काही व्हायचे राहीलेच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता त्यामुळेच माझे मन समाधानी झाले आहे.
5:42
