सांडुनिया सर्व लौकिक
2406.
सांडुनिया सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावे ॥१॥
पाहूनिया झाडे वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावे ॥धृपद॥
वेंचूनिया चिंध्या भरूनिया धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावे ॥२॥
तुका म्हणे ऐसे मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥
अर्थ :
सर्व लौकिकाची लाज टाकून दया आणि यदुराज म्हणजे पांडुरंगाला भक्तिभावाने आळवा. कोणतेही झाड पाहून त्याचा पाला वरबडावे व तो खाऊन विठ्ठलाला आळवावे. कोठेही पडलेल्या चिंध्या गोळा करून त्यात धागा भरून म्हणजे ते शिवून ढुंगणाला गुंडाळावे आणि देवाला आळवावे. तुकाराम महाराज म्हणतात असे वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याची नारायण कधीही उपेक्षा करत नाही.
