जगाचियें देही नांदतो
2370.
जगाचियें देही नांदतो आपण । तरी करतें कर्म परियेसा ॥१॥
जीव शिव दोन्ही शरीरी नांदती । कर्मधर्म स्थिति तया हाती ॥२॥
शिव तो उपाधीवेगळाचि वसे । कामक्रोध पिसे जीवालागीं ॥३॥
लिगाडाचे मिसे जीवासी बंधन । एका जनार्दनी जाण शिव मुक्त ॥४॥
