घटामाजी घालिजे अमृत
2358.
घटामाजी घालिजे अमृत । अथवा घालिजे खात मूत ॥१॥
घट घाई करिता चूर । आकाशासी नुमटे चीर ॥२॥
घट फोडुनी केला नाश । आकाश तैसेंचि अविनाश ॥३॥
तेवीं देव नश्वर जाण । एका जनार्दनी परिपुर्ण ॥४॥