ताट भोक्ता आणि भोजन
2387.
ताट भोक्ता आणि भोजन । जो अवघाचि झाला आपण ॥१॥
भली केली आरोगण । सिद्ध स्वादुचि झाला आपण ॥२॥
कैसी गोडी ग्रासोग्रासी । चवी लागली परम पुरुषी ॥३॥
रस सेविता स्वमुखे । तेणे जगदुदर पोखे ॥४॥
संतृप्त झाली तृप्ती । क्षुधेतृषेची झाली शांती ॥५॥
एका जनार्दनी तृप्त झाला । शेखी संसारा आंचवला ॥६॥
