वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

भूमी शोधोनी साधिले क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086281 · अभंग क्र. २३९५

2395.
भूमी शोधोनी साधिले काज । गुरुवचन बीज पेरियलें ॥१॥
कैसे पिक पिकलें प्रेमाचें । सांठवितां गगन टाचें ॥२॥
सहाचारी शिणले मापारी । कळला नव्हे अद्याप वरी ॥३॥
एकजनार्दनी निजभाव । देही पिकला अवघा देव ॥४॥
२३९६ .
मी मी म्हणता अवघे मी जालों
मी मी म्हणता अवघे मी जालो । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलो ॥१॥
मी ना कोणाचा ना माझे कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥
माझे मीपण मजमाजीं निमाले । एकोनेक सकळ सहजी सहज जाले ॥३॥
एकाजनार्दनी गणीत नवानी येकु । परापरते सारुनी उगला सिध्दांतु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग