वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

स्थापक व्यापक सर्वदे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086314 · अभंग क्र. २३६५

2365.
स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहता तो भला पंढरीये ॥१॥
असोनिया नसे नसोनियां असे । योगिया हृदयी वसे दृष्टी न पडे ॥२॥
एका जनार्दनी भुवैकुंठनायक । उभा असे सम्यक विटेवरी ॥३॥
२३६६ .
जेथोनि त्रिपुटीचें विंदान 2366
जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दरुशन ॥१॥
अध्यात्म अधिभुत असता पाही । अधिदैव सुर्य जेथे नाही ॥२॥
अध्यात्म अधिदैव दोन्ही आहे । अधिभुत दृश्य दरुशन पाहे ॥३॥
जेथे दृश्याचें दरुशन । तेथे एक जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग